तर्‍हाडी विद्यालयात शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात

0

आयोजित स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील 105 संघांनी घेतला सहभाग

तर्‍हाडी । जिल्हा क्रीडा कार्यालय व शिरपूर तालुका क्रीउा समिती यांच्या विद्यमाने शिरपूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा अण्णासे साहेबराव सोमा पाटील विद्यालयात संपन्न झाल्यात. त्यात शिरपूर तालुक्यातील 14,17,19 वर्षाआतील मुले व मुली 105 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात 14 वर्ष आतील मुले अण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालय, तर्‍हाडी – विजयी व आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय, बभळाज – उपविजयी, 17 वर्ष आतील मुले – आर.सी.पटेल विद्यालय, शिरपूर – विजयी व आर.सी.पटेल विद्यालय, बभळाज उपविजयी, 19 वर्षे आतील – डॉ.व्ही.व्ही.रंधे इंग्लिश मेडीयम ज्यू.कॉलेज शिरपूर – विजयी व कला व विज्ञान महाविद्यालय अर्थे – उपविजयी.

यांनी घेतले परीश्रम
14 वर्षे आतील मुली – मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय शिरपूर – विजयी व एच.आर.पटेल कन्या विद्यालय शिरपूर उपविजयी, 17 वर्षे – च.आर.पटेल कन्या विद्यालय शिरपूर -विजयी व एच.आर.पटेल कन्या विद्यालय वरूळ – उपविजयी, 19 वर्षे आतील क.स.बर्वे ज्यु.कॉलेज शिरपूर – विजयी व एच.आर.पटेल कन्या ज्यू.कॉलेज शिरपूर – उपविजयी संघ ठरले आहेत. त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. पंच म्हणून भूषण चव्हाण, करण शिंदे, सागर माळी, मयुर पाटील, निखील मराठे, सचिन सिसोदीया, रोहित बागुल, ए.डी.महाज, रावसाहेब चव्हाण, आर.यु.चौधरी, प्रा.राधेश्याम पाटील, दुष्यंत पाटील, व्ही.ई.शिसोदे यांनी काम पाहिले.