शिरपूर । तालुक्यातील तर्हाडकसबे येथे डॉ.जितेंद्र ठाकुर यांच्या प्रयत्नाने एल.ई.डी.हायमस्ट मंजुर झाले असून या विकास कामांचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकुर, तालुकध्यक्ष राहुल रंधे आणि शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर्हाडकसबे येथे महाजन बाबांच्या यात्रेनिमित्त ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 54 हायमस्ट एलईडी डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले आहेत. तसेच चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून अमरधामचे कामाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ.जितेंद्र ठाकुर यांच्याकडे गावातील भाजपाचे पदाधिकारी हेमराज पाटील, योगेश पाटील आणि महेश सोनवणे यांच्यासह गावातील नागरीकांनी भेट घेवून सांगीतले की गावात पुरेसे विद्युत खांब नसल्याने अर्थे गांव अंधारात राहत असल्याची तक्रार केली होती.
पदाधिकार्यांचा सत्कार
यावेळी हेमराज राजपूत, रोहित शेटे,मनोज महाजन, प्रफुल्ल पाटील, भामपूरचे सरपंच बाळासाहेब पाटील, दिपक ठाकुर, सुनिल धनगर, जि.प.सदस्य संजय पाटील सर,चंद्रकांत पाटील, दिपक पाटील, पंचायत समिती सदस्य ब्रिजलाल मोरे, सुरेश भील, संजय आसापुरे, शाम पाटील, जगदीश पाटील, बन्सीलाल चौधरी, सरपंच चित्राबाई भील, महेश सोनवणे, योगेश पाटील, हेमराज पाटील, भिकापाटील, नाना कोळी, तुकाराम कोळी, रविंद्र गिरासे, शांताराम कोळी, निळकंठ पाटील, पुंडलिक पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सर्व भाजप पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
आभार व्यक्त
याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचाही बबनभाऊ चौधरी, डॉ.जितेंद्र ठाकूर, राहुल रंधे, हेमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सरपंच यांनी डॉ.जितेंद्र ठाकुर यांनी पाठपुरावा करुन काम मंजुर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.