मुंबई : ‘सिंबा’ २८ डिसेंबरला रिलीझ होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाचं प्रोमोशन्स जोरात सुरु आहे. प्रमोशसाठी ‘सिंबा’ची टीम रायपूर येथे गेली आहे. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान रोहित शेट्टीने चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
एक दाक्षिणात्य चित्रपट पाहात असताना आपल्याला ‘सिंबा’ची कल्पना सुचली असल्याचे रोहित शेट्टीने सांगितले. हा चित्रपट पाहताच असा चित्रपट नक्की बनवायचा हे ठरवलं आणि यातूनच ‘सिंबा’ची कल्पना सुचल्याचं रोहितनं म्हटलं. सिंबा चित्रपटात रणवीर संग्राम भालेराव नावाच्या पोलिसाची भूमिका साकारणार आहे.