मुंबई : बॉलीवूडचे सर्वात प्रायव्हेट लग्न म्हणजे दीपिका आणि रणवीरचं. १४-१५ नोव्हेंबरला इटलीत या दोघानीं लग्न केले. त्या दिवशी दीपिका आणि रणवीरचे लाखो चाहते त्यांची एक झलक पाहायला सोशल मीडियावर डोळा लावून बसले होते. नवरदेव-नवरीच्या कपड्यात दीपवीर कसे दिसत आहेत ? त्यांनी काय परिधान केलं असेल ? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. मात्र या सगळ्या प्रशनांना दिपवीरने लवकर उत्तर देत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटर लग्नातले फोटो पोस्ट केले.
लग्नात दीपिकाने मरून रंगाचा लेहंगा तर रणवीरनेही मरून रंगाची शेरवानी घातली होती. दोघांच्या लग्नातील पोशाख सुप्रसिद्ध डिझाइनर सब्भ्यासाची यांनी तयार केला होता. खूप खास पद्धतीने दोघांचा पोशाख तयार केलेला होता. खुद्द सब्भ्यासाचीने याचा विडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने पोशाख बनविण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे.