नवी दिल्ली – लॉकडाउन, आयसोलेशन आणि करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला नसता तर करोना बाधितांची संख्या खूप मोठी असती. सांख्यिकी विश्लेषणानुसार लॉकडाउन आणि अन्य उपायोजना केल्या नसत्या तर १५ एप्रिलपर्यंत देशात करोनाचे ८.२ लाख रुग्ण असते, अशी माहिती समोर आली आहे.
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०,३०० पर्यंत पोहोचली व ३४० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. पहिल्या लॉकडाउननंतर करोना व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसल्यामुळे ३ मे पयर्र्ंत दुसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. काल एकाच दिवसात देशभरात १४०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली व ३१ जणांचा मृत्यू झाला. पहिल्या टप्यातील लॉकडाऊनच्या शेवटच्या आठवडयात करोना बाधितांचा आकडा ६०२६ व मृतांची संख्या २२९ ने वाढली आहे. यावरुन कोरोना किती वेगाने पसरतो, याची प्रचिती येते.
Prev Post