… तर आज व्यक्ती केंद्रीत राज्य : जयंत पाटील

0

मराठा भूषण गौरव पुरस्काराचे वितरण

चिंचवड : शिवरायांनी निर्माण केलेले राज्य हे व्यक्ती केंद्रित नव्हते तर समाज केंद्रीत असल्याने ते स्वराज्य बनले. यामुळे स्वराज्य तब्बल दीडशे वर्षे टिकले. सध्या व्यक्ती केंद्रीत राज्य असल्याचे दिसून येते, असे उद्गार माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी काढले. अखिल मराठा विकास संघ आणि संस्कार सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने शिवजयंती निमित्त वाल्हेकरवाडी येथे डस्टबिन वाटप आणि मराठा भूषण गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

बालशाहिर भूतकरचा पोवाडा
यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ समाजसेवक हणमंत देशमुख, नगरसेवक संजय वाबळे, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे आदी उपस्थित होते. बालशाहिर शुभम भूतकर हा पोवाड्याचे सादर केले. संस्कार सोशल फाऊंडेशनच्यावतीने शंभर सोसायट्यांना कचरा पेट्याचे व एक लाख गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मराठा भूषण गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

विविध पुरस्कारांचे मानकरी
या पुरस्कारांमध्ये चाकणच्या माजी नगरध्यक्ष पुजा कड, शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रा. शिवराज पाटील, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. विष्णू माने, टेक्नॉलॉजी भैय्या पाटील, दुर्गामित्र प्रशांत विनोदे, रमेश मालुसरे, सामाजिक क्षेत्रासाठी प्रदीप वाल्हेकर, संधिवात तज्ञ डॉ. निलेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, सामजिक क्षेत्रासाठी दत्तप्रसाद खंडागळे, जाहिरात क्षेत्रासाठी रमेश सातव, क्रीडा क्षेत्रासाठी पै. अशोक शिर्के, औद्योगिक क्षेत्रासाठी शिवाजी जाधव, कामगार क्षेत्रासाठी सुजीत पाटील, औद्योगिक क्षेत्रासाठी अमित घाडगे, ऋषिकेश पाटील यांचा समावेश आहे.

तेव्हा अराजकता नव्हती
पाटील पुढे म्हणाले की, पन्नास वर्षे आयुष्यातील महाराजांनी 34 वर्षे सर्वोत्तम जातिधर्माचे राज्य घडविण्यात खर्च केले. महाराज राज्यात कित्येक महिने नव्हते तरीपण राज्यात अराजकता माजली नाही. कारण हे सर्व जाती धर्माचे, शेतकरी, व्यापारी यांचे सर्वांचे राज्य होते. सर्व प्रजेला आपले राज्य वाटत होते. राजे सर्व जातीच्या लोकांना प्रिय होते. हा त्यांचा महिमा होता. ते युगपुरुष होते.

महाराजांचे धोरण राबवावे
यावेळी श्रीमंत कोकाटे म्हणाले की, शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे होते. त्यांची कोणत्याही राजाशी तुलना होवू शकत नाही. महाराज हे जगासाठी एक प्रेरणास्रोत होते. ते केवळ लढाया करीत नव्हते तर उत्तम प्रशासक, मॅनेजमेंट गुरु होते. शेतकर्‍यांसाठी त्यांनी एक वेगळे कृषी धोरण आखले होते. शेतजमीन संपादित करताना तो समाधानकारक मोबदला द्यावा, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किंवा भाजीच्या देठाला हात लावता कामा नये. दुष्काळ समयी शेत सारा कमी घेत व बिन व्याज कर्ज देत असत. शेतीसाठी जलसिंचन उपलब्ध करून दिले. हे कृषी धोरण आजच्या सरकारने राबविल्यास शेतकरी आत्महत्या करनाऱ नाही. आजच्या सरकार सारखे अभ्यास सुरू आहे ही भूमिका घेत नव्हते. त्यामुळेच धर्मा पाटील सारखे प्रकरण घडले नाही. आज शेतकरी मेला पाहिजेत अशी परिस्थिती निर्माण केली.

पाठ्यपुस्तकात समावेश करावा
महाराजांनी आपल्या घरी राजारामसाठी गरीब गुजर घराण्यातील बीना हुंडा सून करून आणली. हुंडा घेणे सामाजिक गुन्हा आहे. महाराजांनी हुंडा बंदी केली. या विषयी पाठ्यपुस्तकात धड्याचा समावेश केल्यास समाजाला फायदा होईल. महाराज मुस्लिमांचे शत्रू अशी प्रतिमा तयार केली. काही जातीच्या समाज कंटकांनी हिंदु मुस्लिमांना दंगलीत अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गारगोटे तर आभार बाळकृष्ण खंडागळे यांनी व्यक्त केले.