राज ठाकरे यांचा चित्रपटगृह मालकांना इशारा
मुंबई : सलमान खानच्या टायगर जिंदा हैं मुळे देवा या मराठी चित्रपटास जर चित्रपटगृहांमध्ये प्राइम टाइम जागा मिळाली नाही, तर महाराष्ट्रात एकही हिंदी चित्रपट दाखवू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. यासंदर्भात चित्रपटगृहांच्या मालकांना ठाकरे यांनी पत्रही पाठवले आहे.
मराठीला प्राइम टाइम शो मिळाले पाहिजे
देवा हा मराठी चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होत असून याच दिवशी टायगर जिंदा हैं देखील प्रदर्शित होत आहे. ठाकरे यांच्या इशार्यामुळे चित्रपटगृहांच्या मालकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे असंख्य दर्शकांनी टायगरसाठी अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे म्हणाल्या, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो मिळाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. देवा ला टायगर जिंदा हैं च्या तुलनेत स्क्रीन स्पेस दिली जात नव्हती. जर हिंदी चित्रपटसृष्टी मराठी चित्रपटाच्या खर्चावर स्क्रीन स्पेस घेत असेल तर आम्ही याचा विरोध करू. आम्हाला देवासाठी स्क्रीन स्पेस हवा आहे.