इंधन परिगणक यंत्रणा नसल्याने उपप्रादेशिक परिवनह अधिकार्यांकडून नोटीस
जळगाव : जिल्ह्यातील ड्रायव्हींग स्कूलच्या अवजड वाहनांना इंधन परिगणक यंत्रणा नसल्याने अशा 26 प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांना उपप्रादेशिक परिहवन कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसात समाधानकारक खुलास न दिल्यास ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षणाचा परवाना रद्दच्या कारवाईला संचालकांना सामोरे जावे लागणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या इशारामुळे प्रशिक्षण देणार्या संचालकामध्ये खळबळ उडाली आहे.
अवजड वाहनाच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्या ड्रायव्हींग स्कूलच्या प्रत्येक वाहनास इंधन क्षमता परिगणक यंत्रणा बसविणे बंधनकारक आहेत. या 26 ड्रायव्हींग स्कूलच्या वाहनांना ही यंत्रणा बसवून ते वाहने चाचणी व मान्यतेसाठी आरटीओ कार्यालयात आणण्याचे सूचीत करण्यात आले होते. या वाहनांवर वाहन चालविण्याची व इंधन क्षमतेची चाचणी विशिष्ट प्रकारच्या व विशिष्ट अंतराच्या मार्गावर घेवून नमुना 5 अ मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. अशा सर्वांना नोटीस बजावून वाहने सात दिवसाच्या आत चाचणीसाठी आणावी व खुलासा सादर करावा, अन्यथा कोणतीही सबब न ऐकता प्रशिक्षणाचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
या केंद्रावर कारवाईची टांगती तलवार
समर्थ मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव),देवरे मोटार ड्रायव्हींग स्कूल(चाळीसगाव), संतकृष्ण प्रसाद मोटार ड्रायव्हींग स्कूल (सावदा,ता.रावेर), रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव),खलाणे मोटार ड्रायव्हींग स्कूल (चाळीसगाव),सिध्दांत मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव), शिर्के मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव),रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव), देशपांडे मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव),साहील मोटार ड्रायव्हींग स्कूल (यावल),राजश्री मोटार ड्रायव्हींग स्कूल (धरणगाव),सागर मोटार ड्रायव्हींग स्कूल (पारोळा),विश्वराज मोटार ड्रायव्हींग स्कूल (चाळीसगाव),साई मोटार ड्रायव्हींग स्कूल (अमळनेर),व्यंकटेश मोटार ड्रायव्हींग स्कूल (चाळीसगाव),राजा मोटार ड्रायव्हींग स्कूल (भुसावळ),पारोळा तिरुपती मोटार ड्रायव्हींग स्कूल (पारोळा), अमळनेर तिरुपती मोटार ड्रायव्हींग स्कूल (अमळनेर), गुरुसुंदरम मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव),दीपक मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव), साई गजानन मोटार ड्रायव्हींग स्कूल (एरंडोल), लोणारी मोटार ड्रायव्हींग स्कूल (कंडारी, ता.भुसावळ),जयअंबे मोटार ड्रायव्हींग स्कूल (अमळनेर), एकता मोटार ड्रायव्हींग स्कूल (अमळनेर), श्याम मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव) व रिलायबल मोटार ड्रायव्हींग स्कूल (जळगाव) आदी.