…. तर तळोदा नपा बरखास्त करणार – मुख्यमंत्र्यांचा इशारा

0

तळोदा- पालिकेत पारदर्शी कारभार झाला नाही तर ही नगरपालिका बरखास्त करणार, असा इशारा मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तळोद्यात दिला. पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शहर सुरक्षित करा

शहराचा विकास करणार -स्मार्ट सिटी च्या माध्यमातून लहान शहराकडे लक्ष केंद्रित केले यासह 3 वर्षात नगर विकासाला चालना मिळाली , तसेच 3 वर्षात राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्त केली. कचर्‍याची विल्हेवाट लावून शहर सुरक्षित करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी याना केले. 2019 साला पर्यंत प्रत्येकाला राज्यसरकाराकडून घर दिले जाणार असून एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पालिकेत काम झाले नाहीत ,पारदर्शी कारभार झाला नाही तर ही नगर पालिका बरखास्त करणार, असा इशाराही त्यांनी दिला.