…तर तुमच्या विमा, पीएफची रक्कम अडकणार

0

नवी दिल्ली । आता आधआरकार्ड अत्यंत अनिवार्य बनले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सेवा, लाभ आणि कोणत्याही प्रकारच्या सबसिडीसाठी आधार क्रमांक 31 मार्चपर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे. 31 मार्चनंतर जर तुमचा मोबाइल क्रमांक, बँक खाते, जीवन विमा किंवा मेडिक्लेेम पॉलिसी, स्वयंपाकाच्या गॅसचा क्रमांक हे आधार कार्डशी लिंक नसतील तर या सेवा बंद होऊ शकतात. अनेक मंत्रालयांंनी 139 सेवा आधारशी लिंक करण्याचे सर्क्युलर गेल्या डिसेंबरमध्ये जारी केले होते. या योजना आधारशी लिंक करण्याचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

सर्क्युलर जारी करण्याची जबाबदारी मंत्रालय आणि राज्यांची
यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण यांच्याकडे केली तेव्हा ते म्हणाले की, अशा प्रकारचे निर्णय आणि सर्क्युलर जारी करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालय, विभाग आणि राज्यांची आहे. 31 मार्चनंतरचा निर्णयही याच संस्था करतील. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेले कॅबिनेट मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा केली असता, आधार कार्डशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे यावर अधिकृत टिप्पणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. पीएफला आधार जोडण्यासाठी पीएफच्या संकेतस्थळावर जा. युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्डने लॉगइन करा. मागवलेली माहिती देऊन आधार लिंक करा. विमा पॉलिसीसाठीही तीच अट आहे. पोस्टाचे व्यवहार, चालक परवाना, पॅन कार्ड, बँक खाते, स्वयंपाकाचा गॅस या सार्‍यासाठी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.