…तर पवारांविरोधात फॉर्मही भरणार नाही; उदयनराजेंना अश्रू अनावर !

0

सातारा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले यांना शरद पवारांबद्दल विचारण्यात आले असता, त्यांना अश्रू अनावर झाले. “शरद पवार माझे आदर्श होते, आहे आणि राहतील असे सांगत असताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. सातारा पोटनिवडणुकीत शरद पवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी, लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी” सांगितले.

विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली . 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार असल्याचे मानले जात आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा होती.