माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची धक्कादायक माहिती
निलेश झालटे,नागपूर- आवश्यकता नसताना बुलेट ट्रेन करण्याचा घाट सरकारने घातला आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा सामान्य नागरिकांना काहीही लाभ होणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे सबसिडी जर दिली नाही तर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट 13 ते 14 हजार रुपये असेल, अशी धक्कादायक माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ‘सुयोग’ या पत्रकारांच्या निवासस्थानी ते बोलत होते.
हे देखील वाचा
यावेळी बुलेट ट्रेन विषयी प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बुलेट ट्रेनने मुंबईहुन अहमदाबादला जाण्यासाठी 3 तास लागणार आहेत. विमानाने जाण्यासाठी या मार्गावर दीड ते अडीच हजार रुपये लागतात. आणि वेळही कमी लागतो. मात्र 3 तास वेळ जाऊन जर सबसिडी दिली नाही तर या बुलेट ट्रेनचे तिकीट 13 ते 14 हजार रुपये राहील, असे चव्हाण म्हणाले. मात्र याला महाराष्ट्र आणि गुजरात सरकार मिळून सबसिडी देईलच असेही ते म्हणाले.
तिसऱ्या आघाडीविषयी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, तिसरी आघाडी हे भाजपने सोडलेलं पिल्लू आहे. तर आघाडीचे ठरले तर त्याचे नेतृत्व सोनिया गांधी करतील, असेही चव्हाण म्हणाले.