…तर महापौरांना घालणार घेराव

0

महापौर चषक स्पर्धेतील विजेत्यांचे पैसे खात्यात जमा झाले नाही

पुणे : महापौर चषक स्पर्धेतील विजेत्यांचे पैसे त्यांच्या खात्यात अद्यापही जमा झाले नसल्याची तक्रार अनेक विजेत्यांनी केली असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. हे पैसे दिले नाहीत, तर महापौरांना घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यांनी दिला आहे. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेले (निवृत्त) कर्नल वसंत दोशी, शशिकांत पाबळे, मनसेचे हेमंत संभूस उपस्थित होते.

महापौर चषक स्पर्धेंतर्गत कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातील बर्‍याच सदस्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण 1500 स्पर्धक होते. या स्पर्धेसाठी क्रीडासंघटकाची नेमणूक करण्यात आली होती. बक्षिसाची रक्कम थेट बँकेत जमा करण्यात येणार होती. त्यामुळे या संघटकांनी स्पर्धकाचा बँक अकाऊंट नंबरही घेणे बंधनकारक केले होते. प्रत्येक लेव्हलला 300 रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानुसार अनेक स्पर्धकांनी चार-पाच लेव्हलपर्यंत स्पर्धा जिंकली आहे.अनेक जणांनी पतसंस्थांचे अकाउंट नंबर दिल्याचा खुलासा करण्यात आला. अशा अकाउंटधारकांच्या नावे धनादेश काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मात्र ते धनादेशही पोहोचले नसल्याची तक्रार केली आहे.