…तर मावळे हे काम करतील!

0

पुतळ्यावरील छत्रासाठी उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई । तिथीप्रमाणे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिवसेना साजरा करत आहे. यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन उद्धव ठाकरे यांनी केले. विमानतळावर रायगडची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार केल्याने तेथे शिवशाही अवतरली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई विमानतळावरील शिवरायांचा हा भव्य पुतळा आहे. मात्र, छत्रपतींच्या पुतळ्यालाच छत्र नाही. मी विमानतळ प्रशासन व इतर यंत्रणांना आवाहन करतो की, त्यांनी महाराजांना असे उन्हा-तान्हात उघडे ठेवणे योग्य नाही. येथे लवकरात लवकर सभामंडपासारखी व्यवस्था करावी. जर तुम्हाला हे जमणार नसेल तर शिवसैनिक व शिवरायांचे मावळे हे काम करतील. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर महाराजांचा भव्य पुतळा आहे. तेथेच शिवसेनेकडून रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. आज सकाळी दहा वाजता ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.