डॉ. अजित नवले यांचा सरकारला इशारा
मुंबई : तीन राज्यांत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोदी सरकारने देशव्यापी कर्जमाफी करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. सत्ताधार्यांनाही या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. दुर्लक्ष केल्यास निवडणुकांमध्ये त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे, असे विधान किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
किसान मार्चने शेतकर्यांच्या 3 प्रमुख मागण्या सर्वच पक्षांच्या अजेंड्यावर आणण्यातही यश मिळवले आहे. सरकारी धोरणांद्वारे आजवर केलेल्या लुटीचा अंशतः परतावा म्हणून शेतकर्यांना देशव्यापी संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भावाची कायदेशीर हमी, शेतीसाठी सर्वंकष पर्यायी धोरण ठरवण्यासाठी संसदेचे एक सत्र आयोजित करावे, या 3 मागण्या किसान मार्चच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आल्या आहेत. सर्वच विरोधी पक्षांच्या राजकीय अजेंड्यामध्ये या मागण्या आहेत.