…तर सेना-भाजपची युती तुटणार; दिवाकर रावतेंचे संकेत

0

मुंबई: दोन दिवसानंतर विधानसभेची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून जागावाटप देखील झाले आहे. मात्र युतीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेले नाही. युती होणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी युती तुटण्याचे संकेत दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भाजपने शिवसेनेला १४४ अर्थात ५० टक्के जागा न दिल्यास युती तुटेल असे विधान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

युतीबाबत काहीही निर्णय झालेला नसताना नाणार आणि आरेवरून युतीचा निर्णय तापला आहे.