पालघर : पालघर जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन आयोजित निवड चाचणी स्पर्धा महाजन गुरुजी आश्रम शाळा तलवाडा येथे पार पडली. या स्पर्धेत सात तालुक्यातील थाय बॉक्सिंग खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा विविध वयोगट व वजन गटात पार पडल्या. विक्रमगड मधील बी.बी.एस शाळेचे खूशी पष्टे, गौरव भुसारे, धिरज पवार, हिनल कुमारन यांनी सुवर्ण, लावण्या कांगणे, प्रणय भडांगे, जिया बिन्नर, मानस पागी, धनंजय जाधव, नंदिनी कांगणे यांनी रौप्य, निधी भानुशाली, श्रवण महाले, शुभम माळगावी, रिया भुसारे, ऋतूराज रडे, सानीका बोबे यांनी कांस्य पदके मिळवली.
निलेश गायकवाड यांनी केले मार्गदर्शन
जव्हार मधील के.व्ही.हायस्कूल, भारती विद्यापीठ, ज्ञान गंगा हायस्कूलचे विशाखा भिसे, फैजान काझी, ऋजुता सोनावणे यांनी सुवर्ण, दिप्ती भिसे, जेहान चिवलवाला, पियूष शिंदे, हर्ष मोहोड यांनी रौप्य पदके, सुजल बुधर, यश वराडे, अनुष्का औसरकर, पूजा सोनावणे, साक्षी जरग, ईशान भिसे, नील मोहोड, ओंकार मुकणे, अली मलिक, रोहन गायकवाड, रूतिका भोईर, हार्दिक सांगळे यांनी कांस्य पदके मिळवली. माध्यमिक आश्रम शाळा तलासरी शाळेतील ज्योती प्रजापती हिने सुवर्ण, जयश्री चौहान हिने रौप्य पदक मिळाले. वरील सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कराटेपटू व थाय बॉक्सर निलेश आत्माराम गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.