तलवारच्या हल्ल्यात एक जण जखमी

0

चाळीसगाव। लहान भावाला दोन जण मारहाण करीत असतांना सोडवण्यासाठी गेलेल्यावर तलवारने हल्ला केला. त्यात एक जण जखमी झाला. इतर तिघांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शहरातील चौधरी वाड्याजवळ घडली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील चौधरी वाडा येथील रहिवासी चेतन सुरेश चौधरी वय 21 हा भाजीपाला विक्रेता याचा लहान भाऊ सनी यास आरोपी चेतन चौधरी, राहुल चौधरी हे मारहाण करीत असताना भावाला सोडवण्यासाठी गेल्याचा राग येवुन राहुल चौधरी याने चेतन सुरेश चौधरी यांना पकडुन ठेवले तर आरोपी चेतन चौधरी याने मारहाण करुन दुखापत केली. दोन महिलांनी देखील शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करीत आहेत.