खडकी : चुलत बहिणी सोबत मैत्रीपुर्ण सबंध असल्याचा राग मनात ठेऊन बोपोडी येथिल एका तरुणास तलवारीचा धाक दाखवुन बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. मारहाणीमुळे जखमी केल्यावरून खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे वृषभ अमरनाथ परदेशी (वय 23) व हरीश परशु राम वाडेकर (वय 25 दोघे रा. बोपोडी) अशी आहेत. घटनेतील इतर दोन आरोपी फरार आहेत. या घटनेत योगेश उर्फ बंटी संतोष जाधव (वय 21 रा.बोपोडी) हा तरुण जखमी झाला आहे. जाधव यांची बहिण प्राजक्ता प्रशांत गायकवाड (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. छाजेड पेट्रोल पंपा शेजारी सावंत नगरी सोसायटीच्या गेट शेजारी जाधव रात्री 8.30 वाजता उभा असताना आरोपी परदेशी व वाडेकर हे त्यांच्या इतर दोन साथीदारां समवेत तेथे आले. परदेशी याने आपल्या चुलत बहिणी सोबत जाधव याचे मैत्री सबंधाबद्दल जाब विचारीत प्रथम शिवीगाळ केली. नंतर साथीदारांच्या मदतीने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. परदेशी याने तलवार काढुन यावेळी जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जाधव जागेवरच बेशुध्द पडला. त्याच्या कुटुंबियांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत आरोपी परदेशी व वाडेकर यांस अटक केली. पुढील तपास पोलिस उप निरिक्षिका ज्योति कडु करीत आहेत.