भुसावळ। शहरातील आर.पी.एफ.बॅरेक भागात तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणार्या पंकज गोविंदा सोनवणे (25, रा.आर.पी.एफ.बॅरेक) या सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार राजेंद्र साळुंके, अयाज सैय्यद, बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहिल तडवी, इशत्याक सैय्यद, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रदीप इंगळे, सोपान पाटील आदींनी केली. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार दिलीप बडगुजर करीत आहेत.
सटोडियांना अटक
शहरातील आगवाली चाळ भागाजवळील प्रतापगढ़ मशिदीजवळ पंचम भगवानदास नंदा (42), देविदास भगवानदास नंदा (47), मोहम्मद फारुक मोहम्मद सिध्दीकी (40, आगवाली चाळ) यांना कल्याण मटका खेळताना विशेष ईआरटी टीमच्या पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 14 हजार 800 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने जप्त करून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.