रावेर : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणार्या अहिरवाडी येथील 29 वर्षीय युवकाविरोधात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी आकाश चौधरी (29) याने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याने पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली. लोकांमध्ये दहशत निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिस कॉस्टेबल चैतन्य पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक नितीन डांबरे करीत आहेत.