तलवारीने केक कापल्याने भुसावळात एकास अटक

0

भुसावळ। मित्रांच्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे एकाला चांगलेच भोवले असून जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने चाळीस बंगला भागातून एकास अटक केली आहे. शहर पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळा उर्फ नरेंद्र अरुण मोरे (वय 30) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

बाळा मोरे याने काही दिवसांपूर्वी मित्रांच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्यानंतर हे फोटो व्हायरल झाल्याची माहिती आहे. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खात्री केली. शुक्रवार 4 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीच्या घरातून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील, शशीकांत पाटील, विनोद पाटील, शरीफ काझी, संजय सपकाळे, दीपक पाटील, युनूस शेख, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने केली.