बोदवड : बोदवड ते मनुर रस्त्यावर तलवार बाळगून संशयीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने त्यास अटक केली.सागर रामचंद्र बावस्कर (मनुर, ता.बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला अधिक कारवाईसाठी बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरोधात बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र गायकवाड, राजेंद्र पवार, उमेशगिरी गोसावी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.