‘तलाकबाबत महिलांच्या हिताचे ऐतिहासिक पाऊल’

0

पुणे । महिलांना तोंडी तलाक देण्याच्या प्रथेला भारतात असंवैधानिक ठरवून बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला, हे महिलांच्या हिताचे ऐतिहासिक पाऊल आहे, अशी भावना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले.

या निर्णयामुळे महिलांना न्याय मिळाला आहे. सर्वच धर्मातील महिलांवर जुन्या प्रथांमुळे होणार्‍या अन्यायाला नव्या प्रागतिक युगात पुनर्विचार व्हायलाच हवा. जाचक रूढी आणि परंपरा बाजूला करून मानवतावादी विचारांना पुढे आणले पाहिजे, असे खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे.