जळगाव: शहरात अवैध वाळू वाहतूक मोठ्याप्रमाणावर वाढली असून महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. मंगळवारी सकाळी अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी पथकाने सावखेडा ते पिंप्राळा रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते.
तहसिल कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर घेवून येत असताना चालकांनी पथकाच्या समोर ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.