वडीलांच्या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी केली 700 रूपयांची मागणी
जळगाव । पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील तलाठी व सहकार्याने तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्याच्या मोबदल्यासाठी 700 रूपयांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहात पकडले असून दोघांविरोधात लाचलुचपत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राजूरी येथील तलाठी कार्यालयात तक्रारदार यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्याच्या मोबादल्यात यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 700 रूपयांची लाचेची मागणी 2 एप्रिल रोजी आरोपी वाडी तलाठी पुनम रामलाल वरकाड (वय-30) व कोतवाल म्हणून काम पाहणारा मधुकर चुडामण पाटील (वय-42) यांनी केली. मात्र तक्रारदार यांची परीस्थिती साधारण असल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला रितसर तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधिक्षक जी.एम.ठाकुर यांनी 13 एप्रिल रोजी सापळा रचून तक्रारदारकडून तलाठी पुनम वरकाड आणि कोतवाल मधुकर पाटील वडीलाच्या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी 700 रूपयांचे घेतांना पोलिस उपअधिक्षक यांनी रंगेहात पकडले. दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.