नवापूर तालुक्यातील सर्व तलाठी यांची तहसिल आवारात गर्दी
नवापुर । त लाठी व मंडळाधिकारी यांच्यातर्फे दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले बंद करणे बाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे यांना महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा नवापुर तर्फे देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी यांनी तहसिल आवारात गर्दी केली होती. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ अन्वये तलाठी व मंडळ अधिकारी आपले कर्तव्य बजावतांना त्यांना नेमुन दिलेले १ ते २१ गांव नमुने यातील अंतर्भूत बाबींची केवळ सत्यप्रत नागरीकांना देण्यात अधिकार आहे, असे असतांना कृषि विभाग, पोलिस विभाग, शिक्षण विभाग व इतर विभागातुन तसेच नागरीकांकडुन शासनातर्फे कुठल्याही प्रकारचा विहीत नमुना किंवा मार्गदर्शक नसलेल्या दाखल्यांची मागणी करतात.सदरील बाबत संदर्भीय क्र.१ व २ मध्ये दिवाणी न्यायाधिश चाळीसगाव व पोलिस उपनिरीक्षक वाशी पोलिस ठाणे मुंबई यांनी उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशाचे आधारे दिले जातात या विषयी कारणे दाखवा नोटीस दिलेले आहे, असे दाखले कुठल्या अधिकाराने तुम्ही देतात अशीही विचारणा केलेली आहे.
नियमासह मार्गदर्शन झाल्यास तलाठी संघ विचार करणार
प्रमाणपत्र न देण्याच्या निर्णय संदर्भ क्र. ३ मधील महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या परभणी येथील मिटींगमध्ये घेण्यात आला आहे. तथापी आपले स्तरावरुन कुठल्या नियमाखाली प्रमाणपत्र निर्गमीत करता येतील. याबाबत नियमासह मार्गदर्शन झाल्यास नंदुरबार जिल्हा तलाठी संघ त्यादृष्टीने विचार करेल तो पर्यतवरील प्रकारचे कुठलेही प्रमाणपत्र तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत देण्यात येणार नाही, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर तलाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश कानडे, सचिव व्ही.एम.गावीत, झेड.के.गायकवाड, एस.एस.जाधव. प्रकाश जामोदकर, एस.बी.यादव, जी.पी.बेदरकर, एस.डी.वसावे, आर.एल.पाडवी, ए.एन.भावसार आदीचा सह्या आहेत.
हे दाखले बंदची केली मागणीखालीलप्रकारचे दाखले याप्रमाणे (१) वारसा प्रमाणपत्र (२) मालकी हक्क प्रमाणपत्र (३) कुटुंबाचे प्रमाणपत्र (४) शेतीचा नकाशा (५) विद्युत जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र (६) विहीर असल्याचे व नसल्याचे प्रमाणपत्र (७) अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र (८) रहिवाशी दाखला/प्रमाणपञ (९) पोलिसाचे प्रमाणपत्र (१०) विद्युत पंप/डिझेल पंप असल्याचे प्रमाणपञ (११) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१२) स्वयंघोषणा प्रमाणपञ (१३) शेतातील पोल पाडण्याचे प्रमाणपत्र (१४) वनविभागातर्फे मागीतले जाणारे प्रमाणपञ इत्यादी.