जळगाव : अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश पाटील अवैध गौणखनिज वाहतूकिला आळा घालण्यासाठी गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना अंचलवाडी ते रणाइचे रस्त्यावर 3 विना परवाना रेती वाहतूक करणारी वाहने आढळून आली. वाहन पोलीस स्टेशनला घेऊन जात असतांना काहींनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. तीन दिवस उलटून देखील अद्यापर्यत मारहाण करणार्या संशयीत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने संबंधीतांना अटक करावी अशी मागणी जिल्हा तलाठी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली. जिल्हाध्यक्ष एन.आर.ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर तलाठी मारहाण प्रकरण
नायब तहसिलदार, तहसिलदार, जिल्हा तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघ, कोतवाल, चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येत आहे. योगेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ 15 तालुक्यातील 432 तलाठी तलाठी संवर्गातील 73 मंडळ अधिकारी व अव्वल कारकून हे तीन दिवसापासून लेखनीबंद आंदोलन करीत आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने तलाठ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जोपर्यत हल्लेखोर व्यक्तींना अटक होणार नाही तोपर्यत जिल्ह्यातील लेखणी बंद आंदोलन सुरु राहिल. आंदोलन काळत्तत जनतेची जी गैरसोय होणार आहे त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल असे आंदोलनकर्ते तलाठ्यांकडून सांगण्यात येत आहे.