तलाठ्याचा अंडा-पाव विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा

रावेर : शहरातील स्टेशन रोडवर एका अंडी विक्रेत्याच्या गाडीवर दारु पिऊन एका तलाठ्याने धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याचे वृत्त आहे.

महसूल विभागाची प्रतिमा मलीन
रावेर तालुक्यातील एका गावातील तलाठ्याने रावेरातील एका अंडा पाव विक्री करणार्‍या विक्रेत्याच्या गाडीवर जावून विक्रेत्याशी डोके लावले व अंडी विक्रेत्याला कारवाईची धमकीदेखील दिली मात्र विक्रेत्याने देखील पोलिसात जाण्याची भूमिका घेता तळीराम तलाठ्याच्या अन्य सहकार्‍याने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडून दोघांनी धूम ठोकली असलीतरी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, धिंगाणा घालणार्‍या तलाठ्याकडे असलेल्या गावापासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक होते मात्र महसूल प्रशासनाचा छुपा असलेला आशीर्वाद यामुळे कारवाई होत नसल्याने अवैध गौण खनिज वाहतुकीला ऊत आला आहे.