तलाठ्यास मारहाण करणार्‍यांना अटक करावी

0

धुळे । अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडी येथील तलाठी योगेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्लाकरणार्‍यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा तलाठी संघातर्फे करण्यात आली आहे. यावेळी तलाठी संघातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

तलाठी योगेश रमेश पाटील हे 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गस्तीवर असतांना त्यांना शितल देशमुख, योगीराज चव्हाण, उमेश वाल्हे, श्रीकांत पाटील, शिरीष पाटील यांच्यासह 20 ते 25 लोकांनी अडवून विनापरवाना रेती वाहतुकीसंदर्भात विचारणा केली असता मारहाण केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील मंडळाधिकारीही उपस्थित होते. यावेळी या जमावाने महसुल विभागाने ताब्यात घेतलेली वाहने सोडून देण्यात यावी अशी मागणी करीत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेमुळे तलाठी संवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन तलाठी बांधवांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे. जोपर्यंत हल्ला करणार्‍या सव र्आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत जिल्हा तलाठी संघाचे आंदोलन सुरु राहील असे जिल्हा तलाठी संघटनेतर्फे एन.वाय.कुळकर्णी, सरचिटणीस वाय.आर.पाटील यांच्यासह तलाठी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.