तलासरीत महामार्गाच्या गटारीचे झाकण गायब

0

तलासरी (सुरेश वळवी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी पाडवीपाडा येथे नाल्यावर बनवलेल्या माहामार्गाच्या गटारांवरील झाकण गायब झाल्याने महामर्गावर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर आतापर्यंत नाल्यावर बनविलेल्या गटारात पडून तीनजण गंभीर जखणी झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पूर्वेकडून पश्चिमेला वाहणार्याण ओढ्यावर तलासरी पाडावीपाडा येथे नाला आहे. महामार्गावरील जमा होणार्याव पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गाशेजारी गटार बनविण्यात आले आणि त्याच्यावर मजबूत झाकण लावले. त्यामुळे महामार्गावरील वाहन थांबविणे किंवा चालत जाण्यासाठी पादचारी या गटारीचा वापर करतात. परंतु पाडावीपाडा येथे असलेल्या नाल्यावरील गटारांची झाकणे गेल्या तीन महिन्यापासून गायब झाली आहेत.

लोखंडी जाळ्या बनल्या धोकादायक
या बाबत महामार्गाची देखभाल करणार्या आयआरबी कंपनीकडे तक्रार करूनही धोकादायक आणि जीवघेण्या ठरलेल्या गटारीचे झाकण लावण्यास किंवा दुरस्त करण्यास चालढकल सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली असून आयआरबी कंपनी, मोठा अपघात किंवा एखाद्या निष्पाप पादचार्‍याचा जीव गेल्यावर गटारीवर झाकण लावणार आहे का? अशा प्रश्न करीत आहेत. तसेच आयआरबीने महामार्गा शेजारी बसविलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्याने धोकादायक बनल्या आहेत.