तळईतील तरुणाचा बारागाड्या ओढताना अंगावरून चाक जाताच मृत्यू

Death of a young man from Talai after being hit by a train एरंडोल : बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात बारागाड्यांचे चाक पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंपाषष्ठीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील तळई येथे बारागाड्यांचा कार्यक्रम सुरू असतानाच राहुल पंडीत पाटील (30) या तरुणाच्या पोटावरून गाड्यांचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू ओढवला.

गर्दीत धक्का लागल्याने दुर्घटना
एरंडोल तालुक्यातील तळई येथे मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढल्या जात असताना राहुल पंडीत पाटील (30, तळई) हा तरुणही उपस्थित होता मात्र गर्दीत धक्का लागल्याने बारागाड्यांच्या समोर आला व त्याच्या पोटावरून चाक केल्याचे गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तळई गावात शोककळा
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला राहुल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नोकरीला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलिस नाईक ललित भदाणे करीत आहे.