तळजाईत दत्तजयंती उत्साहात साजरी

0
पुणे : विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे धनकवडीतील तळजाई पठार येथील श्री साईदत्त नगर येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला.
उत्सवानिमित्त तीन दिवस भजन, कीर्तन, हरिपाठ पठण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. श्री दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. सायंकाळी सहा वाजता दत्तजन्म सोहळा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.उत्सवात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, अ‍ॅड. प्रमोद पुठ्ठा, प्रा. मच्छिंद्र दिवटे, निवृत्ती बिरादार, एच.डी.आटोळे,दिलीप माळी, दिलीप जामदार, पांडुरंग काळे, मुकेश गांधी आदी पदाधिकारी सहभागी होते.