पिंपरी-चिंचवड : तळवडे येथील ज्योतिबा तरूण मंडळाच्या वतीने श्री ज्योतिबा देवाचा उत्सव व ज्योतिबा मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 6 ते 10 एप्रिलदरम्यान, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा हरिनाम सप्ताहाचा आज (दि. 6) पासून सुरुवात होत आहे. 6 रोजी सकाळी 7.30 वाजता कलश, वीणा व टाळ पूजन त्यानंतर सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमात दररोज पहाटे 5 ते सकाळी 7 श्रींची महापूजा व काकड आरती, दुपारी 4 ते सायंकाळी 6 हरिपाठ व सायंकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.
कार्यक्रमांची रुपरेषा
7 रोजी सायंकाळी 7 ते 9 ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन, 8 रोजी सायंकाळी 7 ते 9 ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन, 9 रोजी सायंकाळी 7 ते 9 ह.भ.प. सुभाष महाराज गेठे यांचे कीर्तन, 10 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 ह.भ.प. सुभाष महाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.