बाधित लाभार्थींना प्लाट वितरीत होणार
पिंपरी चिंचवड – तळवडे त्रिवेणीनगर ता. हवेली जि. पुणे येथील स्पाईन रस्त्याने बाधितांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून मंजूर झालेल्या पेठ क्रमांक ११ मधील पर्यायी निवासी जागा क्रमांक A, B, C चे ले-आऊटमधील जागेच्या सोडत काढण्यात आली. तळवडे, त्रिवेणीनगर ता. हवेली जि. पुणे येथील ७५.०० मीटर स्पाईन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५२.०० मीटर ते ६०.०० मीटर बाधितांच्या पुनर्वसनासाठी नगररचना विभाग यांचे मार्फत रस्ता बाधीत धारकांची यादी एकुण १२६ अंतिम करण्यात आलेले आहे. त्यापैंकी ७७ लाभार्थांची सोडत दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी काढण्यात आली होती.
४६ लाभार्थींची सोडत…
उर्वरित ४६ लाभार्थींची सोडत शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद क्रिडा संकुल, कृष्णानगर सेक्टर नं. १८ या ठिकाणी आयुक्तांच्या आदेशानुसार पार पडली. अति. आय़ुक्त अजित पवार यांच्या नियंत्रणाखाली योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे, फ प्रभाग अध्यक्षा यांचे उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी रस्ता रुंदीकरणामध्ये बाधीत होणाऱ्या लाभार्थींना वितरीत होणाऱ्या प्लॉट तसेच सोडती बाबतची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. तसेच, नागरिकांच्या शंकांचे निरसरण करण्यात आले. यावेळी सर्व बाधीत लाभार्थी त्यांचे नातेवाईक व भुमि- जिंदगी विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.