ऐरोली : सिडको प्रशासनाने भर पावसाळा असतानाही आपली अतिक्रमण विरोधी मोहीम चालूच ठेवली आहे. पालिका आणि सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनाधिकृपणे बांधण्यात आलेल्या इमारतींवर हातोडा चालविण्याचे काम सिडकोने चालूच ठेवले आहे. यामध्ये तळवली गावातील 700 मीटरच्या भूखंडावर असलेल्या अनाधिकृत 4 मजली इमारतीवर हातोडा चालविण्यात आला. या ठिकाणी बांधकाम तोडण्यासाठी जागा अरुंद असून बाजूला बैठ्या चाळी असल्याने ब्रेकरच्या सहाय्याने इमारत तोडण्याचे काम केले.
कारवाईसाठी 20 लेबर, 70 पोलीस कर्मचारी
याविषयी अधिक माहिती देताना अतिक्रमन अधिकारी पी बी राजपूत यांनी सांगितले की तळवली गावामध्ये अनाधिकृपणे 4 मजली इमारत बांधण्यात आली आहे. ही जमीनदोस्त करण्याचे काम चालू आहे, पहिल्या टप्प्यात ब्रेकरच्या मदतीने तोडण्यात येत असून या करिता 20 लेबर , 70 पोलीस कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सदर कारवाई ही अशीच पुढे चालू राहील अशी माहिती सिडकोचे मुख्य अतिक्रमण अधिकारी एस एस पाटील यांनी दिली यावेळी मुख्य अतिक्रमण अधिकारी पी बी राजपूत, सुनील चिरसाळे, व्ही व्ही जोशी, कार्यकारी अभियंता आर एम कुसाळकर, आदी उपस्थित होते.