तळवेलच्या वृद्धाचा विषारी द्रव प्राशनाने मृत्यू

0

वरणगाव- तळवेल येथील रहिवासी गणसिंग धनसिंग राजपूत (70) यांनी गुरुवार, 23 रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान कुठलेतरी विषारी कीटकनाशक द्रव्य सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. नितीन नवलसिंग राजपूत (तळवेल) यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.