तळवेलच्या विवाहितेची आत्महत्या

0
भुसावळ- तालुक्यातील तळवेल येथील दुर्गा संतोष नेटके (22) या विवाहितेने तळवेल शिवारातील विहिरीतच उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी वरगणाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेचे रावेर तालुक्यातील चापोरा येथील माहेर असून चार दिवसानंतर तिच्या भावाचे लग्न असल्याचे समजते. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण कळू शकले नाही. या प्रकरणी वरणगाव पोलिसात सोपान तुकाराम पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेच्या पश्‍चात अडीच वर्षांचा मुलगा व एक महिन्यांची मुलगी आहे तर विवाहितेचा पती गवंडी काम करीत असल्याचे सांगण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.