भुसावळ- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तळवेल फाट्याजवळ रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो गाडी व अॅपे रीक्षात समोरा-समोर धडक होवून अॅपेतील जागीच ठार झाली तर चालक गंभीर जखमी झाला. राष्ट्रीय महामार्गावरील तळवेल गावाजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास वरणगाव येथुन मुक्ताईनगरकडे जाणारी महिंद्रा बोलेरो (एम.एच. 19 बी.जे.5758) या गाडीने मुक्ताईनगर कडून येणार्या अॅपे रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यु.748) ला समोरून जोरदार धडक दिल्याने अॅपे रिक्षातील महिला राधाबाई कोंडीराम भालेराव (55, चोपडा नाका, यावल) ह्या जागीच ठार झाल्या तर रीक्षा चालक मिलींद बळीराम मोरे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शैलेश शरद हिवरे यांच्या फिर्यादीनुसार महिंद्रा गाडी चालक प्रवीण मदन सोनवणे यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.