भुसावळ– तालुक्यातील तळवेल येथे उकीरड्यावर शेण टाकण्यास मनाई केल्याने एकाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी काशीनाथ नारायण कोळी यांना मारहाण केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सिद्धार्थ गोविंद सुरवाडे, गोविंदा नामदेव सुरवाडे व अशोक बळीराम साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अशोक देवरे करीत आहेत.