तळवेल येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यु

प्रतिनिधी । वरणगांव

तळवेल येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात विजेचा धक्का लागुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे .या प्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .

 

तळवेल येथील निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय – ४३ ) हे मंगळवारी सकाळी शेतातील विजपंप सुरु करीत असतांना त्यांना विजेचा धक्का लागला . यामुळे ते शेतात बेशुद्ध पडले याची माहिती मिळताच लगतच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमाकांने घटनेची नोंद होवून ती वरणगांव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मयतावर तळवेल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . मयत सोपान पाटील यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.