तळवेल येथे कडब्याच्या ढिगार्‍यास आग

0
भुसावळ – तालुक्यातील तळवेल येथील शेतात ज्वारी कापून उरलेल्या कडब्याच्या ढिगार्‍यास रविवार 5 रोजी अचानक आग लागल्याने यात हजार पेंडी चार्‍याची जळून राख झाली.
तळवेल येथील शेतकरी अमोल सोपान शिंदे यांचे गट क्रमांक 644  मध्ये तीन ते चार एकरवर ज्वारीची लागवड केली होती. शिंदे यांनी ज्वारी कापून उरलेल्या कडब्याच्या नऊशे ते हजार पेंड्यांचे ढिग लावून ठेवले होते. मात्र रविवारी या ढिगार्‍यास कुणीतरी अज्ञातांनी आग लावून पेटवून दिल्याचे समोर आले. शेतकरी अमोल शिंदे हे सकाळी शेतात गेले असता त्यांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी पाहणी केली. तेव्हा कुणीतरी पेपरच्या सहाय्याने कडब्याचे ढिग पेटविल्याचे आढळून आले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतन झोपे व इतर शेतकरी उपस्थित होते.