तळवेल येथे लाईनमनचा खांबावरुन पडून मृत्यू

0

वरणगाव। येथून जवळच असलेल्या तळवेल येथील विद्युत उपकेंद्रावर कार्यरत असलेला डिंगबर यशवंत भारंबे (वय 30) या लाईनमनचा खांबावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार 14 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली.

लोखंडी गेटच्या रॉडचा पोटाला मार
तळवेल येथील वीज ग्राहक गोपाळ पाचपांडे यांच्या घराचा विजपुरवठा खंडीत असतांना सदरची तक्रार निवारण करण्यासाठी लाईनमन डिगंबर यशवंत भारंबे (वय 30, रा. साकरी, ता. भुसावळ) व अन्य दोन सहकारी कर्मचारी समेत कामासाठी गेले. भारंबे इलेक्ट्रीक खांबावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागून खाली असलेल्या घराच्या गेटवर पडला असता भारंबे यांच्या छातीला व पोटाला गेटच्या लोखंडी रॉडचा मार लागला. त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. डिगंबर यांचे लग्न मार्चमध्ये झालेले होते.’