वरणगाव : तळवेल शिवारातील शेतातून सुमारे एक लाख रुपये किंमतीचे शेती साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. तळवेल शिवारातील गट नंबर 748 मध्ये सोपान हरी राणे यांचे शेत असून या शेतामध्ये पक्के वीट बांधकाम केलेले घर बांधण्यात आले आहे. ेतीसाठी लागणारे एक लाख 23 हजार 303 रुपये किमतीचे तण नाशक मटेरीयल, युरीया पोट्याश, ग्लाय फास्पेट आदी साहित्य चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी सोपान हरी राणे (66) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.