तळागळातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणा

0

नवापूर । श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे आदिवासी दिन व ऑगष्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संजीवकुमार पाटील तर प्रमुख अतिथी प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक डी.बी. बेंद्रे, पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, ए.बी. थोरात, वरिष्ठ शिक्षक, निर्मला वसावे, सी.एन. बर्डे, वर्धावे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक ख्वाज्या नाईक, तंट्या भिल, बिरसा मुंडा, उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.

राज्यस्तरावरून प्रामाणिक प्रयत्नांची गरज
आपल्या अध्यक्षीय भाषणातून संजीवकुमार पाटिल यांनी आजच्या कार्यक्रमाचे औचित्य केवळ उत्सवापूर्त न राहता समाजातील तळागाळातील प्रत्येक आदिवासी बंधू भगिनींना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांचे शिक्षण, आरोग्य, न्याय, रोजगार यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगितले. शिक्षकांमधून सरला गावीत, भरत सैंदाने, मनोज पाटिल, निंबुदास गावीत या प्रसंगी प्रशिक्षणार्थी बी.एड. शिक्षक कुश वसावे, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर विध्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद वाघ यांनी तर सूत्रसंचालन ए.एम. वळवी यांनी केले. आभार सोनू गावीत यांनी मानले.