पुरंदर । उपेक्षित घटकांतील नागरिकांच्या अनेक समस्या व प्रश्न आहेत. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ या घटकांना मिळत नाही. या लोकासाठी काम करीत तळागळातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील धिवार यांनी सांगितले.सोमुर्डी (ता. पुरंदर) येथे बहुजन हक्क परिषदेच्या शाखेचे उद्घाटन सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप हे होते. यावेळी धिवार बोलत होते. प्रा. केशव काकडे, महेश सूर्यवंशी, नानासाहेब मदने, प्रमोद जगताप, धनंजय भांडवलकर, बापू भोसले, दादा भोराडे, रामदास भोराडे, विलास भोराडे, सिंधू ताठेले आदी मान्यवर याप्रसंग उपस्थित होते.
लोणकर यांचा सत्कार
कवी राजेंद्र सोनवणे, व्याख्याते प्रा. सागर चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी बहूमताने निवडून आल्याबद्दल पत्रकार सुनील लोणकर यांचा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रांचे प्रास्ताविक धनंजय भांडवलकर यांनी केले. बहुजन हक्क परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अक्षय चाचर यांनी सूत्रसंचालन केले. तर शाखा अध्यक्ष शशिकांत भोराडे यांनी आभार मानले.
सोमुर्डी येथील परिषदेची कार्यकारिणी
अध्यक्ष शशिकांत भोराडे, उपाध्यक्ष सागर कुर्हाडे, सचिव सतिश भोराडे, सहसचिव बाळासाहेब ताठेले, महिला अध्यक्षा कमल भोराडे, महिला उपाध्यक्ष कुसुम कदम, महिला सचिव रखमा भोराडे, महिला सहसचिव रखमा भांडवलकर.