तळेगावचे दोघे तरूण अपघातात ठार

0

तळेगाव खिंडीत भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक

तळेगाव दाभाडे : भरधाव जाणार्‍या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तळेगाव येथील दोन तरूण ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर तळेगाव खिंडीत घडला. या अपघातात संकेत संतोष गुंडळा (वय 17, रा. तळेगाव) व सीताराम मल्लापाबंदी छोडे (वय 21, रा. तळेगाव) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू उशिरापर्यंत सुरू होते.

पुण्याकडे येत होती बस
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून मुंबई-जामखेड ही परिवर्तन बस मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होती. तळेगाव खिंडीत या बसने संकेत व सीताराम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. संकेत हा विद्यार्थी होता. तर सीताराम हा प्लम्िंबगची कामे करत होता. याप्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.