बेकरीला आरोग्य विभागाने ठोकले ‘सील’
तळेगाव दाभाडे : परिसरातील बेकरीतून खरेदी केलेल्या पॅटीसमध्ये आळ्या आढळण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. बेकरीतून होत असलेली खराब पदार्थ विक्री आणि अस्वच्छतेच्या कारणास्तव लिंब फाटा, मारुती मंदीर रस्त्यावर असलेल्या भंडारी हॉस्पिटलजवळील साईदीप बेकर्स अँड स्वीट या दुकानास नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने सील ठोकले. दीपेश धनाजी जाधव (वय 19, रा.भेगडेआळी, तळेगाव दाभाडे) यांनी या बेकरीतून सकाळी आठ पॅटीस खरेदी केले. पार्सल असलेले पॅटीस दीपेश जाधव यांनी घरी नेले. मात्र, त्यावर अळ्या व बुरशी असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. पॅटीस बदलून घेण्यासाठी ते बेकरीत आले. मात्र, तोपर्यंत पॅटीस आणि आळ्याची ही गंभीर बाब वार्यासारखी पसरली. काही युवकांनी दुकानातील खराब सामान बाहेर फेकले.
नगरसेवकांनी केली पाहणी
हे देखील वाचा
सामाजिक कार्यकर्ते राहुल भेगडे आणि सचीन बिराजदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून परिस्थिती हाताळली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, घटनास्थळी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे ही बाब गंभीर असून कारवाई करण्याच्या फुले यांना सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे निरीक्षक प्रमोद फुले हेही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. खबरदारी म्हणून प्रमोद फुले यांनी बेकरीस सील ठोकले आहे. जप्त केलेला माल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फुले यांनी सांगितले.
नागरिकांच्या जीवाशी खेळ
याबाबत दीपेश जाधव यांनी सांगितले की, या बेकरीतून नेहमी खरेदी करत असतो. या बेकरीमध्ये अनेकदा केक, खारी आदी बेकरीचे पदार्थ घेण्यासाठी आम्ही जात असतो. नेहमीप्रमाणे हे पॅटीस घेऊन घरी आल्यावर पाहिले तेव्हा, त्याला बुरशी लागलेली दिसून आली. त्यानंतर त्यात आळ्याही आढळून आल्या. त्यामुळे बेकरीत जाऊन तक्रार करेपर्यंत अनेक लोक तेथे जमा झाले होते. त्यामुळे नगरसेवकांच्या कानावर जाताच तेही आले. तसेच आरोग्य विभागाचे पथक येऊन बेकरीला सील ठोकले. नागरिकांच्या जीवावर हे बेतू शकते. त्यामुळे