तळेगावात ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम

0

तळेगाव दाभाडे : भारताच्या स्वातंत्र्यदिनी तळेगाव शहर परिसरात ध्वजारोहण, मानवंदना, प्रभातफेर्‍या, राष्ट्रगान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालायातील ध्वजारोहण नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्याचे आमदार संजय (बाळा) भेगडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, अ‍ॅड रवींद्र दाभाडे, श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, श्रीमंत यज्ञीसेनिराजे दाभाडे, सुलोचनाताई आवारे, कृष्णा करके, उमाकांत कुलकर्णी, मीराताई फल्ले, सुरेश चौधरी, मुकुंदशेठ खळदे, गटनेते सुशील सैदाणे, बापूसाहेब भेगडे, यादवेंद्र खळदे मुख्याधिकारी वैभव आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमेलता खळदे, यांचेसह आजी माजी नगरसेवक, विविध संस्थाचे पदादिकारी नागरिक उपस्थित होते.

सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष समीर दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी माऊली दाभाडे, श्रीमंत यज्ञीसेनिराजे दाभाडे महाव्यवस्थापक बबनराव दाभाडे, शामराव दाभाडे, साहेबराव दाभाडे, गोरख दाभाडे, मनोहर दाभाडे,सोनाबा गोपाळे सह मान्यवर उपस्थित होते.

इंद्रायणी महाविद्यालय
इंद्रायणी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, आदि मान्यवर उपस्थित होते. तळेगाव जनरल रुग्णालयात हेमंत सरदेसाई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ दिलीप भोगे, डॉ अशोक निकम, बांधकाम व्यवसायिक शैलेश शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

राजकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण
तळेगाव शहर भाजप कार्यालयामध्ये तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिजामाता चौकात शिक्षण मंडळाचे माजी सदस्य महेश कदम, यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, नगर सेवक व मान्यवर उपस्थित होते.

शाळांमध्ये विविध कार्यक्रम
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण सभापती संग्राम काकडे, अरुण भेगडे पाटील, अनिता पवार, हेमलता खळदे, संध्या गणेश भेगडे, सुलोचना आवारे, प्राची हेंद्रे, संतोष शिंदे, अमोल शेटे, संदीप शेळके, इंदरकुमार ओसवाल यांचे हस्ते करण्यात आले. याशिवाय राव कॉलनी येथे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सभापती विशाल वाळुज, अकुश भेगडे, राजेंद्र बांदल, बाळकृष्ण जगताप, निंबाळकर, मेढी,आदी मान्यवर उपस्थित होते. इतर संस्थामध्ये ध्वजारोहण ,ध्वजवंदन, मानवंदना.खाऊ वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाले. विध्यार्थी हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत, राष्ट्रगान, आणि घोषणा देत होते. शाळा संस्थामध्ये ध्वजाभोवती रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटी केल्या होत्या.