विजेचे दोन पंप झाले नादुरुस्त
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इंद्रायणी पाणीपुरवठा योजनेतील विजेचे दोन पंप एका पाठोपाठ नादुरुस्त झाल्याने तळेगाव स्टेशन भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होऊन नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तळेगाव स्टेशन विभागातील इंद्रायणी पाणीपुरवठा योजनेमधून स्टेशन भागत पाणीपुरवठा होत आहे. पंपावर काम करणार्यांकडून निष्काळजीपणामुळे एका पाठोपाठ एक असे 2 पंप नादुरुस्त झाले आहेत. यावरून स्टेशन परिसरातील यशवंतनगर, तपोधाम कॉलनी, चाकणरोड परिसरातील नागरीकाना पाणी पुरवठा होत असतो. परंतु पंपावरील पाणी उपश्याचे पंप नादुरुस्त झाल्याने या भागत दिवसाआड दिवस पाणी येत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
या पाणीपुरवठा योजनेतून दररोज सुमारे एक कोटी लिटर पाण्याचा रोज पुरवठा होत आहे. या दोन पंपातून तासाला सुमारे 4 लाख 50 हजार लिटर पाणी उचलले जाते. परंतू सध्या एकाच पंपावरून पाण्याचा उपसा होत असल्यानेयाचे प्रमाण निम्यावर आले आहे.त्यामुळे या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.तसेच पंपाचे दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हातात घेतले असून लवकर पाणी पुरवठा सुस्थितीत येईल असे तळेगाव दाभाडे नगर परीषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख स्मिता गाडे यांनी सांगितले